करमाळा/प्रतिनिधी
आदिनाथ कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा या मागणीसाठी सभासदांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मदत केली.
मनाचा मोठेपणा दाखवत सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी स्वतःचे संस्थेतून 11 कोटी रुपयांची मदत आदिनाथ कारखान्याला करून आदिनाथ वरची लिलाव प्रक्रिया थांबवली अशा परिस्थितीत सुद्धा मयताच्या टाळूवरचं लोणी खावे या प्रवृत्ती प्रमाणे 2915 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे दहा हजार होते विक्री केलेल्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आठ संचालकांनी केल्यामुळे चेअरमन धनंजय डोंगरे व या प्रक्रियेत सहभागी असलेले नेतेमंडळी वादात सापडले असून ही प्रक्रिया रद्द करण्याची वेळ चेअरमन धनंजय डोंगरे यांच्यावर आली आहे.
भ्रष्टाचाराच्या ग्रहणामुळे अडचणीत आलेला आदिनाथ कारखाना तब्बल तीन वर्षांनी चालू होत असताना अजून काही जणांचे पोट भरत नसल्याचे दिसून येत आहे आता या प्रकरणात मदत केलेली मंत्री तानाजीराव सावंत काय भूमिका घेणार याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
आदिनाथ कारखान्याची दहा हजार पोती साखर 2915 प्रत्येक क्विंटल प्रमाणे विक्री करण्याचा निर्णय डोंगरे यांनी घेतला व संबंधित व्यापाऱ्यांकडून आदिनाथ कारखान्याच्या खात्यावर रक्कम भरून घेतली हा व्यवहार झाल्याची अनेक संचालकांना माहीत नव्हते.
यावेळी उपाध्यक्ष रमेश कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित व्यापारासोबत चर्चा केल्यानंतर सध्या बाजारात तीन हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे साखरेचे दर असल्याचे निदर्शनास आले व या वाढीव दराने साखर घेणाऱ्या व्यापाऱ्याला थेट कारखान्यावरच पाचारण केले.
यावेळी कार्यकारी संचालक बागनवार यांनी नऊ संचालकांनी नंतर केलेल्या मागणीनंतर तीन हजार 100 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे साखर विक्री करण्याचा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. म्हणजेच प्रतिक्विंटल 185 रुपये जास्त दराने दहा हजार कोटी साखर विकली तर जवळपास 19 लाख रुपयाचा फायदा आदिनाथ कारखान्याचा होणार का पुन्हा जुन्याच दराने साखर विकणारा हा प्रश्न चर्चेला जात आहे.
2915 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे साखर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याकडून कोणी किती रुपये कमिशन घेतले याची चविष्ट चर्चा संचालक मंडळात सुरू आहेत.
एका बाजूने अनेक सभासद बंद पडलेला कारखाना सुरू व्हावा म्हणून कारखान्याची मदत निधी म्हणून लाखो रुपयांच्या रकमा देत आहेत मात्र दुसरीकडे कारखान्याची विश्वस्त म्हणून काम करणारे काही जण आपला प्रपंच मोठा करण्यासाठी साखर विक्रीतील कमिशन कमवत आहेत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आदिनाथ मधील स्टोअर मधील करोडो रुपये चे सामान चोरीला गेले आहे काही संचालक व काही कर्मचाऱ्यांनी संगणमतांनी हे सामान लंपास केल्याची चर्चा आहे या प्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे तरीसुद्धा संचालक मंडळ याबाबतीत गुपचूप आहे.
त्याचप्रमाणे अनेक संचालक व सभासदांनी अनामत रक्कम म्हणून कारखान्यातून जवळपास आठ ते नऊ कोटी रुपयांची रक्कम उचलली आहे या रकमेला कोणतीही ते व्याज देत नाहीत व रक्कम भरत नाहीत अशा संचालकावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी सभासदांमधून होत आहे.
कारखान्यावरील कारवाई थांबविण्यासाठी 13 सप्टेंबर रोजी तात्काळ पैशाची गरज होती त्यादिवशी एक दिवसा करता प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या एका संस्थेकडून दोन कोटी सत्तर लाख रुपये उसनवार घेतले होती त्याप्रमाणे एका व्यापाऱ्याकडून 2915 प्रमाणे ऍडव्हान्स रक्कम भरून घेऊन कारखाना राज्य सहकारी बँकेतून घेण्याची प्रक्रिया पार पाडली त्या दिवशी हा व्यवहार होत नव्हता तर कोर्टाचा अवमान म्हणून चेअरमन व कार्यकारी संचालकावर कारवाई झाली असती.