उत्तराखंडमध्ये बीआरओकडून 20 हजार फुटांच्या उंचीवर रस्ता
वृत्तसंस्था / देहरादून
उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्हय़ात 4 मेपासून आदि कैलास आणि ओम पर्वताची यात्रा सुरू होणार आहे. भाविक पहिल्यांदाच तवाघाट येथून आदि कैलास अन् ओम पर्वतापर्यंत वाहनांनी जाऊ शकणार आहेत. सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) सुमारे 20 हजार फुटांच्या उंचीवर 130 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आल्याने हे शक्य झाले आहे.
भाविक आतापर्यंत तवाघाट पॉइंटपासून ही यात्रा पायीच पूर्ण करत होते. आदि कैलासला भारताचे कैलास मानसरोवर देखील म्हटले जाते. चीनच्या कब्जातील तिबेटमध्ये असलेल्या कैलास शिखराची छाया ज्याप्रकारे मानसरोवरात दिसते, तसेच आदि कैलास पर्वताची छाया पार्वती कुंडात दिसून येते.









