ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी मनसे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्यावर केला होता. आता मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण (Manoj Chavan) यांनीही बांदेकर यांच्यावर हाच आरोप करत बांदेकरांच्या चौकशीची मागणी केली आहे.
मनोज चव्हाण म्हणाले, सिद्धिविनायक न्यास मंदिराकडून दरवर्षी दैनंदिनी डायरी काढली जाते. पण यंदा ती निघाली नाही. त्याला आदेश बांदेकर जबाबदार आहेत. या डायरीवर उद्धव ठाकरे यांचा फोटो हवा असा बांदेकर यांचा अट्टाहास असल्याची माहिती आहे. याला काही विश्वस्तांचा विरोध आहे. त्यामुळे ही डायरी काढण्यात आली नाही. बांदेकर सिद्धिविनायक न्यास मंदिराला प्रायव्हेट कंपनी समजत आहेत. या प्रकरणावरून आदेश बांदेकर यांची चौकशी करावी. याबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
अधिक वाचा : राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक होणार; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट
दरम्यान, आदेश बांदेकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. कोरोना काळातील दोन वर्ष अर्थिक खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी ही डायरी छापण्यात आली नाही. ट्रस्टमध्ये कोणताही गैरव्यवहार नसून, राजकीय हेतूने मनसे आरोप करत आहे. त्यामध्ये तथ्य नाही, असे बांदेकर यांनी म्हटले आहे.








