21 ते 31 जानेवारी दरम्यान धावणार जादा बसेस
बेळगाव : भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी 21 ते 31 जानेवारी दरम्यान बेळगाव-सौंदत्ती मार्गावर अतिरिक्त बस धावणार आहेत. 25 रोजी शाकंभरी पौर्णिमा आहे. या पार्श्वभूमीवर जादा बस सोडण्याचा निर्णय परिवहनने घेतला आहे. गतवर्षी झालेल्या शाकंभरी पौर्णिमेला भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे उत्पन्नात भर पडली होती. यंदादेखील पौर्णिमेतील अतिरिक्त बससेवेतून परिवहनला अतिरिक्त उत्पन्नाची अपेक्षा आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. दरम्यान भक्तांची गैरसोय होवू नये यासाठी परिवहनकडून 30 जादा बस सोडल्या जाणार आहेत. यात्रा काळात कोणतीही गैरसोय होवू नये, यासाठी अतिरिक्त बस धावणार आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बेळगाव-सौंदत्ती मार्गावर ही विशेष बस सुरू राहणार आहे. बेळगाव, चंदगड, निपाणी, गडहिंग्लज येथून शाकंभरी पौर्णिमेसाठी सौंदत्तीला जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. यासाठी परिवहनकडून अतिरिक्त बस सोडली जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ksrtc.karnataka.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुकेंग व्यवस्था उपलब्ध आहे. याचबरोबर बसस्थानकात आगाऊ तिकीट बुकींग व्यवस्था करण्यात आली आहे.
रात्री 10 वाजेपर्यंत बससेवा सुरू राहणार
21 ते 31 जानेवारी दरम्यान बेळगाव-सौंदत्ती मार्गावर 30 अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. शिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार आणखीन बसची व्यवस्था केली जाणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून यात्रा काळात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही बससेवा सुरू राहणार आहे.
– के. के. लमाणी-डीटीओ









