वृत्तसंस्था/ मुंबई
देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये आठ मार्चला संपलेल्या आठवड्यामध्ये 10.47 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. यायोगे विदेशी चलन साठा 636.10 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षाचा विचार करता विदेशी चलन साठा सध्याला उच्चतम पातळीवर कार्यरत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंबंधीची माहिती नुकतीच दिली आहे. 14 जुलै 2023 नंतर आठ मार्चला संपलेल्या आठवड्यामध्ये भारतीय विदेशी चलन साठ्यात सर्वाधिक वाढ दर्शवली गेली आहे. याआधी 1 मार्च 2024 ला संपलेल्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 6.55 अब्ज डॉलरने वाढला होता आणि 625.63 अब्ज डॉलरवर पोहोचला होता.









