नवी दिल्ली :
देशातील विदेशी चलन साठ्यामध्ये एक वर्षात झालेल्या घसरणीनंतर चांगली वाढ झालेली आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातली माहिती दिली असून 12 जानेवारीला संपलेल्या आठवड्यामध्ये देशातील विदेशी चलन साठा 1.63 अब्ज डॉलर इतका वाढून 618.94 अब्ज
डॉलरवर पोहोचला आहे. यापूर्वीच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 5.89 अब्ज डॉलरने घसरणीत राहिला होता. मागच्या वर्षी जागतिक घटनाक्रमांमुळे रुपयाच्या बचावासाठी रिझर्व्ह बँकेने चलन साठ्यातील काही भाग वापरला होता.









