सावंतवाडी : प्रतिनिधी
माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. एस. के. उर्फ संजय काशिराम सावंत यांना लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयल तर्फे सावंतवाडी विभागासाठी सन 2023 साठीचा लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी 3 वाजता गडहिंग्लज येथे एका भव्य समारंभात केले जाणार आहे. एस. एस. सी. बोर्डाचे सचिव मा.दत्तात्रय पोवार यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. गेल्यावर्षी युवा संदेश प्रतिष्ठान, नाटळ या संस्थेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्री सावंत सरांना प्राप्त झालेला आहे. ते कार्यरत आहेत त्या धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेच्या अध्यक्षा, कार्याध्यक्ष, सचिव आणि समन्वय समिती सचिव आणि सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.









