सावंतवाडी / प्रतिनिधी
Adarsh Granthpal Sevak Award announced to Mahendra Patel, Librarian of Sawantwadi Shri Ram Vachan Mandir
येथील श्रीराम वाचन मंदिरचे ग्रंथपाल महेंद्र जनार्दन पटेल यांना सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श ग्रंथपाल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 19 मार्चला होणाऱ्या गोवेरी येथील ज्ञानदीप वाचनालयात जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात पुरस्कार वितरण होणार आहे . या पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण ,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण होणार आहे . जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने दरवर्षी आदर्श ग्रंथपाल सेवक पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर चे ग्रंथपाल श्री पटेल यांना देण्यात येणार आहे . श्री पटेकर हे गेली 23 वर्षाहून अधिक काळ सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिरातकार्यरत आहेत . तसेच ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.









