बेळगाव – महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने प्रति वर्षीप्रमाणे २०२२ -२३ सालचा आदर्श शाळा पुरस्कार खालील शाळांना जाहीर करीत आहोत.
इंग्रजी शिक्षणाकडे सर्वांची ओढ असून देखील पुरस्कार प्राप्त शाळांनी आधुनिक शिक्षण पद्धती अवलंबत मातृभाषेतून शिक्षण देता देता वेगवेगळे प्रयोग आणि उपक्रम आपल्या शाळेत राबविले आहेत, या शाळा सरकारी असून देखील विद्यार्थ्यांची पटसंख्या उल्लेखनीय आहे. आणि दर्जेदार शिक्षणातून या शाळा आपला वेगळा ठसा उमटवत आहेत म्हणून युवा समिती त्यांच्या कार्याची दखल घेऊन आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरव करत आहे.
हे पुरस्कार बेळगाव मधील ५ मतदारसंघ निहाय जाहीर करण्यात आले आहेत.
*बेळगाव उत्तर- कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळा, कॅम्प बेळगाव*
*बेळगाव ग्रामीण- सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, सांबरा ता.जि.बेळगाव*
*बेळगाव दक्षिण- सरकारी मॉडेल शाळा येळ्ळूर, ता.जि. बेळगाव*
*खानापूर- सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा इदलहोंड, ता. खानापूर जि. बेळगाव*
*यमकनमर्डी- सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा काकती, ता. जि.बेळगाव*
सर्व शाळांच्या शिक्षकवर्ग, शाळा सुधारणा कमिटी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सदर पुरस्काराचे वितरण मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता *मराठा मंदिर* खानापूर रोड बेळगाव येथे होणार असून संबंधित शाळेच्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, शा.सु.समिती, आणि पालकवर्ग यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा असे आवाहन करण्यात आले आहे.









