मुंबई :
अदानी समूहातील विविध कंपन्यांचे समभाग शेअरबाजारात पुन्हा एकदा आपली चमक दाखवायला लागले आहेत. यादरम्यान सोमवारी समूहातील कंपनी अदानी पॉवरचे समभाग एनएसईवर 5 टक्के इतके वाढत 321 रुपयांवर पोहचले होते. अमेरिकेतील गुंतवणूक फर्म जीक्यूजीतील 8.1 टक्के हिस्सेदारी मागच्या आठवड्यात कंपनीने विकली आहे. यासोबत अदानी पोर्टस (2.4 टक्के), अदानी एंटरप्रायझेस (2 टक्के), अदानी ग्रीन, अदानी ट्रान्स्मीशन, अदानी विल्मर यांचेही समभाग तेजीत होते.









