नवी दिल्ली
अदानी समूहाकडून श्रीलंकेत सुरु करण्यात आलेला प्रकल्प पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कंचना विजेसेकरा यांनी याबाबतची माहिती नुकतीच दिली आहे. अदानी समूहातील अदानी ट्रान्स्मीशन कंपनीने श्रीलंकेतील उत्तर व पूर्व विभागात 500 मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवला आहे. सदरच्या प्रकल्पाचे काम सध्याला वेगात सुरु असून 2024 च्या डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. 500 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक अदानीकडून होणार असून याअंतर्गत मन्नारमधील प्रकल्पातून 286 मेगावॅट तर पुनरीनमधून 234 मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. श्रीयुत गौतम अदानी यांनी 2021 मध्ये श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत चर्चा केली होती.









