वृत्तसंस्था /नवी दिल्ली
खाद्यतेल बनवणाऱ्या अदानी विल्मरने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा नफ्याचा निकाल जाहीर केला असून 79 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा कंपनीने पेलला आहे. स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घट आणि उत्पन्नात आलेली कमतरता यामुळे कंपनीला तोटा सहन करावा लागला असल्याचे कारण सांगितले जात आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये समान अवधीत कंपनीने 194 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. अदानी विल्मरचे एकूण उत्पन्न जून तिमाहीअखेर 12 टक्के घटून 12,928 कोटी रुपये राहिले होते. एक वर्षापूर्वी याच अवधीमध्ये 14,724 कोटी रुपये उत्पन्न कंपनीने प्राप्त केले होते. अदानी समूहाची ही कंपनी असून फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत खाद्यतेलांची व इतर वस्तुंची विक्री भारतीय बाजारात करते.









