मुंबई :
सर्वोच्च न्यायालयाने अदानी हिंडनबर्गसंबंधी प्रकारणाची सुनावणी राखीव ठेवल्याने मंगळवारी कंपनीचे विविध समभाग शेअरबाजारात 20 टक्के इतके वधारलेले पाहायला मिळाले. यात अदानी टोटल गॅसचा समभाग 20 टक्के इतका वाढला होता. अदानी एनर्जी सोल्युशन्सचा समभाग 13 टक्के वाढ 824 रुपयांवर पोहचला होता. अदानी ग्रीन एनर्जीचा समभाग 8 टक्के, अदानी पॉवर 7 टक्के आणि अदानी विल्मरचे समभाग 6 टक्के इतके वाढले होते.









