मुंबई
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील विविध कंपन्यांचे समभाग पुन्हा एकदा तेजीचा सूर पकडत आहेत. अदानी एंटरप्रायझेसचे समभाग सोमवारी 8 टक्के इतके वाढले होते. समूहातील किमान 6 समभागांना 5 टक्के अप्पर सर्किट लागले होते. अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 8 टक्के वाढीसह 2063 रुपयांवर तर अदानी पॉवरचे 5 टक्केसह 177, अदानी ट्रान्स्मीशनचे समभाग 780 रुपयांवर पोहचले होते.









