नवी दिल्ली
प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्या मालकिच्या अदानी एंटरप्रायझेसने भारतीय शेअर बाजारात 4 ट्रिलीयनचा बाजार भांडवल मूल्य प्राप्तीचा टप्पा नुकताच पार केला आहे. अशा प्रकारचा टप्पा पार करणारी ही चौथी कंपनी ठरली आहे. दुपारी 1.24 मिनीटांवर कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 4.04 ट्रिलीयनवर पोहचलं होतं. बीएसईवर एकंदरीत बाजार भांडवल मूल्याच्या तुलनेत कंपन्यांच्या क्रमवारीत अदानी एंटरप्रायझेसचा नंबर 15वा लागतो.









