मुंबई :
अदानी समूहातील ऊर्जा क्षेत्रात कार्यरत कंपनी अदानी पॉवरचा समभाग बुधवारच्या शेअरबाजारातील सत्रात 4 टक्के इतका वाढत 329 या उच्चांकी स्तरावर व्यवहार करत होता. याआधीच्या सत्राम समभाग 316 रुपये या भावावर बंद झाला होता. गेल्या 6 महिन्यातील समभागाची घोडदौड पाहिल्यास समभाग जवळपास 54 टक्के इतका वधारल्याचे दिसून आले आहे. कंपनी आपल्या सप्टेंबरअखेरच्या तिमाहीचा निकाल 2 नोव्हेंबर रोजी जाहीर करणार असल्याचे समजते.









