मुंबई :
थर्मल व सोलार प्लांटस्च्या माध्यमातून ऊर्जा उत्पादन करणाऱ्या अदानी पॉवरचा समभाग सोमवारी जबरदस्त तेजीत पाहायला मिळाला. कंपनीने आपल्या समभागांची 5 हिस्स्यांमध्ये विभागणी करणार असल्याची घोषणा केली होती. अदानी समूहातील या कंपनीचा समभाग मुख्य बाजारात घसरण असतानाही तेजीत होता. सुरुवातीच्या सत्रात सोमवारी अदानी पॉवरचा समभाग 20 टक्के वाढत 168 रुपयांवर इंट्रा डे दरम्यान कार्यरत होता. कंपनीने आपल्या समभागाची फेस व्हॅल्यु 10 रुपयांहून कमी करत 2 रुपये केली. म्हणजेच ज्यांच्याकडे या कंपनीचा एक समभाग आहे त्यांना आता 5 समभाग मिळणार आहेत. 1 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटला मान्यता देण्यात आली होती. रिटेल व छोट्या गुंतवणूकदारांची भागीदारी वाढावी यासाठी असे करण्यात आल्याचे समजते.









