हिंडनबर्गच्या अहवालानंतर शेअर मार्केटमध्ये जबरदस्त फटका बसलेल्या अदानी समुहाने आज अखेर आपला एफपीओ मागे घेतला. अदानी समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसने आपल्या गुंतवणूकदारांना संभाव्य तोट्यापासून वाचवण्यासाठी कंपनीची 2.5 अब्ज डॉलरची शेअर विक्री मागे घेतली. आपल्या गुंतवणूकदारांना संबोधित करताना, एफपीओसह पुढे जाणे हे “नैतिकदृष्ट्या योग्य” नसल्याचे म्हटले आहे.
गौतम अदान यांच्या अदानी समुहाने अदानी एंटरप्रायजेस या कंपनीकालई आपले एफपीओ बाजारात विक्रिसाठी आणले होते. ३१ जानेवारीपर्यंत जगभरातील गुंतवणूकदारांना अदानी समुहात पैसे गुंतवण्याची संधी शेवटची संधी होती. पण अमेरिकास्थित हिंडनबर्ग या रिसर्च कंपनीने आपला अहवाल प्रसिध्द करून अदानी समुहावर अर्थिक अनियमितता आणि नागरिकांच्या फसवणुकीचा आरोप केला. हिंडेनबर्गच्या अहवाला नंतर अदानी समुहाचे शेअर्स धडाधड पडत राहील्याने त्याचे भारतीय शेअर्स मार्केटवरही परिणाम दिसून आले.
काल केंद्रिय अर्थसंकल्प झाल्यावर अदानी समुहाने एक निवेदन जारी करून एफपीओ मागे घेत असल्याचे म्हटले आहे. तसेच या अर्थिक परिस्थितीत एफपीओसह पुढे जाणे नैतिकदृष्ट्या योग्य असणार नाही. गुंतवणुकदारांचे पैसे त्यांना परत मिळतील असेही गौतम अदानी यांनी आपल्या गुंतवणुकदारांना संबोधित करताना म्हटले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









