वृत्तसंस्था / मुंबई
प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांची कंपनी ओशन स्पार्कल लिमिटेड (ओएसएल)मध्ये 100 टक्के अधिग्रहण करणार असल्याचे समजते. सदरच्या कंपनीत समूह 75 टक्के हिस्सेदारी प्रत्यक्षात अधिग्रहण करण्यासाठी 1135 कोटी रुपये मोजणार असून यानंतर 24 टक्के इतकी हिस्सेदारी अप्रत्यक्षरित्या अधिग्रहण करण्यासाठी 394 कोटी रुपये मोजणार असल्याचे समजते. यायोगे अदानी समूह ओएसएलचे संपूर्णपणे अधिग्रहण करणार असल्याचे सांगितले जाते.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील 6 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी वरील संदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलणार आहेत. एका माहितीनुसार अदानी पोर्टस् अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन्स लिमिटेडची (एपीएसईझेड)सहकारी अदानी हार्बर सर्व्हिसेसकडून ओएसएलमधील अधिग्रहणासाठी करार होणार आहे.
समभागधारकांना लाभ
एपीएसईझेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी यांनी यासंदर्भातली माहिती नुकतीच दिली आहे. या दोन्ही कंपन्यांना मिळून आगामी काळात व्यवसाय विस्तार करण्याची संधी असणार असून यातून 5 वर्षात प्राप्ती वाढण्याची शक्यता आहे. ज्याचा लाभ अदानी पोर्टसच्या समभागधारकांना होणार आहे.









