न्यूयॉर्कस्थित हिंडेनबर्ग रिसर्च ( Hindenberg Researh ) या संस्थेने गेल्या आठवड्यात आपल्या अहवालात अदानी उद्योग समूहामध्ये ( Adani Group ) अर्थिक अनियमीततेचा आरोप केला. त्यामुळे दोन दिवसातच गौतम आदानी ( Gautam Adani ) यांच्या शेअर्सने बाजारात जोरदार आपटी खाल्ली. त्यामुळे अदानी उद्योगसमूहाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अदानी उद्योग समूहावर झालेला आरोप “भारतावर झालेला हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंडनबर्ग रिसर्च संस्थेला ‘मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन’ असे संबोधून अदानी समुहाने हा अहवाल वाचून धक्का बसला असल्याचे म्हटले आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे वाईट हेतूने केलेले नियोजनात्मक कार्यक्रम म्हणजे हिंडनबर्गचे दस्तऐवज असून अदानी ग्रुपला बदनाम करण्यासाठी ही चाल असल्याचे म्ह्टले आहे.
हिंडेनबर्ग संशोधन संस्थेच्या 106 पानांच्या अहवालाला अदानी समुहाने 413 पानांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यात “शेअर्सच मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणूक” असा आरोप करण्यात आला होता. त्यावर अदानी समूहाने “हा केवळ कोणत्याही विशिष्ट कंपनीवर केलेला आरोप नसून भारतावर झालेला आरोप आहे. तसेच भारतीय उद्योग संस्थांचे स्वातंत्र्य, अखंडता आणि गुणवत्ता तसेच भारताची वाढ आणि महत्त्वाकांक्षेवर घेतलेली शंका आहे.”
न्यूयॉर्क फर्मच्या अहवालामुळे अदानी समूहाला दोन दिवसामध्ये 50 बिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर स्वता अदानी उद्योगसमुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना 20 बिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झालं आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








