जून तिमाहीतील निकाल जाहीर, 3312 कोटींचा महसुल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अदानी समुहातील कंपनी अदानी ग्रीन यांचा पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून कंपनीने 713 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. कंपनीने याच तिमाहीमध्ये 3312 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे. 28 जुलै रोजी कंपनीचे समभाग शेअर बाजारात 2.25 टक्के तेजीसमवेत कार्यरत होते. इंट्राडेदरम्यान कंपनीचा समभाग 22 रुपयांनी वाढत 997 रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीचे बाजार भांडवलमूल्य सध्याला 1.62 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 446 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. याचाच अर्थ मागच्या वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत नफा 60 टक्के वाढला आहे. तर महसुल याच अवधीत 2528 कोटी रुपयांचा कमाविला होता.
ऊर्जा क्षेत्रात गती
कंपनीने आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत 45 टक्के वाढीसोबत 15816 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती केली आहे. गुजरात, राजस्थान आणि आंध्रप्रदेशमध्ये कंपनीने 3763 मेगावॅट इतकी ऊर्जा सौरप्रणाली मार्फत तयार केली आहे. या शिवाय गुजरातमध्ये 885 मेगावॅट ऊर्जा पवन प्रणाली मार्फत तयार केली आहे.









