नवी दिल्ली :
हरित ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी अदानी एनर्जी ही कंपनी आगामी काळात 12 हजार 300 कोटी रुपये उभारण्याची योजना बनवत आहे. क्वॉलीफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटअंतर्गत सदरचा निधी उभारला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अदानी ग्रीनला मार्चला संपलेल्या तिमाहीमध्ये 507 कोटी रुपयांचा नफा प्राप्त झाला होता. मागच्या वर्षी समान अवधीत हाच नफा 121 कोटी रुपयांचा होता.









