मुंबई
अदानी एंटरप्रायझेसचे समभाग मंगळवारी शेअरबाजारात 2 टक्के इतके घसरणीत होते. कंपनी 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ सादर करणार असून यासंबंधी बाजाराकडे कंपनीने रितसर अर्ज केला असल्याची माहिती आहे. पीटीसी इंडियामध्ये हिस्सा खरेदी करण्याचाही कंपनीचा बेत असल्याचे समजते. अदानीचा समभाग मंगळवारी 1.60 टक्के घसरत 3560 रुपयांवर खाली आला होता.









