अहवालानंतर समभाग 4 टक्क्यांनी वधारले : काही कंपन्यांचे समभाग मात्र प्रभावीत
मुंबई :
अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने मंगळवारी डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिस्रया तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने या तिमाहीत 820 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. एका वर्षापूर्वी समान तिमाहीत कंपनीला 12 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. सप्टेंबर 2022 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला 460 कोटींचा नफा झाला असल्याची नोंद करण्यात आली होती.
कंपनीने एकूण उलाढालीमधून महसूल 42 टक्के वाढीसह 26,612 कोटी रुपये प्राप्त केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत 18,758 कोटी रुपये इतका महसूल प्राप्त करण्यात आला होता. त्याचवेळी, कंपनीचा एकूण खर्च वाढून 26,171 कोटी रुपये झाला होता. जो एक वर्षापूर्वी 19,047.7 कोटी रुपये होता.
अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 4 टक्क्यांनी वाढले
निकालानंतर, अदानी एंटरप्रायझेसचा हिस्सादेखील सुमारे 4 टक्क्यांनी वाढत आहे. यापूर्वी त्याचवेळी, समूहातील 10 पैकी 6 कंपन्यांचा हिस्सा 5 टक्केच्या खाली आहे. यामध्ये ग्रीन एनर्जी, पॉवर, टोटल गॅस, ट्रान्समिशन विल्मर आणि एनडीटीव्ही यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सिमेंट कंपनी अंबुजा आणि एसीसी यांचे समभागही खाली आहेत. तथापि, अदानी पोर्ट्सचे शेअर्स सुमारे 0.39 टक्केवर व्यापार करत आहेत.
जागतिक अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी 24 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, 14 फेब्रुवारी रोजी अदानींची एकूण संपत्ती 4.31 लाख कोटी रुपये झाली. सोमवारपर्यंत त्यांची एकूण संपत्ती 4.49 लाख कोटी रुपये होती आणि ते 23व्या क्रमांकावर होते. 24 जानेवारीला हिंडेनबर्ग अहवाल समोर येण्यापूर्वी ते यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते.









