मुंबई
उत्तम व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर मार्च अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत अदानी एंटरप्रायजेसने आपल्या नफ्यामध्ये जवळपास 138 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. व्यवसायातील वाढीमुळे कंपनीने 722 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा जानेवारी ते मार्चच्या कालावधीमध्ये प्राप्त केला आहे. या आधीच्या वर्षामध्ये याच तिमाहीमध्ये कंपनीने 304 कोटी रुपये नफ्याच्या बदल्यात मिळवले होते. म्हणजेच कंपनीने नफ्यामध्ये दुप्पट वाढ नोंदवली आहे.









