पोस्टर शेअर करत अभिनेत्रीने दिली माहिती
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा आता नव्या अवतारात दिसून येणार आहे. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटामुळे चर्चेत आलेली अदा आता अॅक्शन करताना ‘हाटक’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर तिने शेअर केले असून यात ती हातात बंदुक पकडून असल्याचे दिसून येते. ‘हाटक-एक दरोडा दयेशिवाय, चित्रिकरण लवकरच सुरु होणार आहे, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असावा’ अशी कॅप्शन तिने दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय के. शर्मा करणार आहेत. अदा या चित्रपटात शिवरंजनी आचार्य नावाची भूमिका साकारणार आहे. यात ती एक सशक्त आणि निडर महिलेची व्यक्तिरेखा साकारत असल्याचे पोस्टर पाहून स्पष्ट होते. चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच राजस्थान आणि उत्तर भारतातील सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणी होणार आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना दरोडा ड्रामाची कहाणी पहायला मिळू शकते. अदाचा हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित केला जाणार आहे.









