प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत साताऱयातील ऍड. कमलेश पिसाळ बिनविरोध निवडून आले असून सलग दुसऱयांदा त्यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे क्रीडाक्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आठ जानेवारीला होणार होती. मात्र, आठ जणांची निवड बिनविरोध झाली आहे. एकूण 16 जागांसाठी ही निवडणूक हेती. यामध्ये लाईफ मेंबर्स, बेनिफॅक्टर्स अँड पेट्रन्स कॅटेगरी, अफिलिएडेट क्लब कॅटेगरीतून दोन तर फाऊंडर जिमखाना, स्पेशल जिमखाना कॅटेगरीतून एक अशा जागा होत्या. तर जिल्हा क्रिकेट संघटनांच्या दहा जागा असून त्यात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व मध्य विभागातील प्रत्येकी दोनजण असा समावेश आहे.
या निवडणुकीत बिनविरोध झाल्यामुळे ऍड. पिसाळ महाराष्ट्र असोसिएशनच्या 16 सदस्यांच्या टीममध्ये ते दुसऱयांदा दाखल झाले आहेत. एमसीएचे नूतन अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी लाभली आहे.
दरम्यान, ही सातारा जिह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे भावना व्यक्त खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. तर ऍड. पिसाळ यांच्या निवडीमुळे क्रिकेट खेळाडूंना चांगला फायदा होईल असे सांगत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांनी ऍड. पिसाळ यांचे अभिनंदन केले आहे.
या निवडीबद्दल ऍड. पिसाळ यांचे ज्येष्ठ क्रीडा संघटक व मार्गदर्शक सुधाकर शानभाग, अजय शिर्के, सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निशांत गवळी तसेच क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले आहे.
चौकट पान 1 वर घेणे
क्रिकेट खेळाच्या विकासासाठी नव्या जोमाने प्रयत्न करणार
महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये दुसऱयांदा काम करण्याची संधी लाभल्याने खूप आनंद झाला आहे. या पदाच्या माध्यमातून मी सातारा जिह्यातील क्रिकेट खेळाच्या विकासासाठी आणखी नव्या जोमाने प्रयत्न करणार आहे. उद्योन्मुख क्रिकेट खेळाडूंच्या अडअडचणी सोडवणे, त्यांना प्रोत्साहन देणे याबरोबरच असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास मी कटिबध्द राहील.
ऍड. कमलेश पिसाळ









