पिंजरा, नवरंगच पर्व संपलं
मुंबई/ प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 97व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचा ‘पिंजरा‘ हा सिनेमा तुफान गाजला होता. शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसफष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम या व्ही शांताराम यांच्या दुस़ऱ्या पत्नी होत्या. त्यांचे मुळ नाव हे विजया देशमुख होते. संध्या यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. शनिवारी सकाळीसाडे दहा वाजता परळ येथील राजकमल स्टूडिमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
व्ही शांताराम यांचा मुलगा किरण शांताराम यांनी संध्या यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ’गेल्या काही दिवसांपासून संध्या या आजारी होत्या. काल संध्याकाळी त्यांचे निधन झाले. आज सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार झाले‘ असे किरण शांताराम यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी वाहिली श्रद्धांजली
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी एक्स अकाऊंटवर संध्या शांताराम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “भावपूर्ण श्रद्धांजली ! ’पिंजरा‘ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसफष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नफत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ’झनक झनक पायल बाजे‘, ’दो आंखें बारह हाथ‘ आणि विशेषत: ’पिंजरा‘ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो!’ असे त्यांनी म्हटले आहे.









