बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरूचा इस्रायलमध्ये अडकली होती. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान आलेल्या या बातमीने सर्वांनाच हैराण केले होते. पण अभिनेत्री सुरक्षितपणे मुंबईत दाखल झाल्याने तिच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. भारतीय दुतावासाच्या मदतीने तिला सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर तिने प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. मात्र, तिच्या माध्यम सूत्रांनी प्रसारमाध्यमांना ती सुखरुपपणे घरी दाखल झाल्याची माहिती दिली.









