लेखक मुदस्सर अजीज होता प्रियकर
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी आणि तिचा प्रियकर मुदस्सर अजीज यांचा ब्रेकअप झाला आहे. दोघेही जवळपास 3 वर्षांपासून परस्परांना डेट करत होते. परंतु दोघांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हुमा कुरैशीपूर्वी मुदस्सरचे नाव अभिनेत्री सुष्मिता सेनशी जोडले गेले होते.
हुमा कुरैशी आणि मुदस्सरने रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही व्यावसायिक कामांसाठी मात्र भविष्यात एकत्र येणार आहेत. हुमा कुरैशी यापूर्वी ‘महारानी 2’ या वेबसीरिजमध्ये दिसून आली होती. तर हुमा लवकरच ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सोनाक्षी सिन्हा देखील मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा मुदस्सर अजीजनेच लिहिली आहे.









