अभिनेत्री सुखरुप : दुर्घटनेत स्वीस जोडप्याचा मृत्यू
वृत्तसंस्था/ रोम
स्वदेस या चित्रपटात दिसून आलेली अभिनेत्री गायत्री जोशी हिच्या कारचा इटलीत अपघात झाला आहे. या दुर्घटनेळी गायत्री स्वत:चा पती विकास ओबेरॉयसोबत प्रवास करत होती. दुर्घटनेत तिची कार एक कॅम्पर व्हॅन आणि अन्य कारला धडकली. या दुर्घटनेत गायत्री आणि तिचा पती बचावले परंतु अन्य कारमधून प्रवास करणाऱ्या स्वीस जोडप्याचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सार्डिनियाच्या एका रस्त्यावर लँबॉर्गिनी आणि फेरारीच्या चालकाने एका कॅम्पर व्हॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना घडली आहे. यानंतर तिन्ही परस्परांना धडकली तर कॅम्पर व्हॅन उलटली आहे. दुर्घटनेनंतर फेरारी कारला आग लागल्याने स्वीस जोडप्याचा मृत्यू झाला आहे. इटलीत आमच्या कारचा अपघात झाला असला तरी देवाच्या कृपेमुळे आम्ही सुखरुप आहोत असे गायत्रीने म्हटले आहे.









