मालिकेच्या सेटवर झाला अपघात
अभिनेत्री तुनिषा शर्मा हिची आत्महत्या ही सर्वांसाठीच धक्कादायक बातमी होती. आत्महत्येनंतर अनेक निर्माते स्वतःच्या कलाकारांची काळजी घेऊ लागले आहेत. अशातच आता आणखी एक गंभीर घटना घडली आहे. ‘बडे अच्छे लगते हैं 2’ मालिकेच्या सेटवर एक मोठा अपघात झाला असून यात अभिनेत्री अलेफिया कपाडिया हिला गंभीर दुखापत झाली आहे.

मालिकेतील एका नृत्याच्या दृश्याचे चित्रिकरण सुरू असताना तिच्या पायावर अवजड सामग्री पडली होती. अलेफिया यामुळे वेदनेने कळवळून खाली बसली तसेच लगेत ती मेकअप रुममध्ये गेली, बराच वेळ ती बाहेर न आल्याने तिच्या सहकलाकारांना या अपघाताबद्दल कळले.
पायाला झालेल्या दुखापतीमुळे असहय़ वेदना होत आहेत. चालण देखील मला कठिण होऊन बसले आहे. सध्या मी आराम करत असून डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करत असल्याचे अलेफियाने सांगितले आहे. अलेफिया सध्या शूटिंगमधून ब्रेक घेत आराम करत आहे. लवकरच ती चित्रिकरणात पुन्हा भाग घेणार असल्याचे समजते.









