Vishal Nikam: ‘बिग बॉस मराठी’सीझन 3 च्या पर्वात विशाल निकम आणि मीरा जगन्नाथ स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.त्यावेळी दोघांमध्ये मैत्री ऐवजी वाद पाहायला मिळाला होता. विजेतेपद पटकावण्यासाठी दोघांमध्ये चुरशीची लढत होती.मात्र,‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात यावेळी घरात चॅलेंजर्स म्हणून आलेल्या विशाल आणि मीराने भरपूर धमाल केली.दोघांमधील मैत्री पाहून चाहत्यांनीही त्यांचे कौतुक केले.याबाबत विशाल निकम याने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.यात त्याने मीरासोबतचा एक फोटो शेअर करत तिचे आभार मानले आहेत.
या पोस्टमध्ये विशाल म्हणतो की,‘लास्ट सीजनमधील अनुभव पाहता आपली मैत्री इतकी खास होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.आपल्या सीजनमध्ये आपण एकमेकांच्या विरोधात उभे होतो, कचाकचा भांडत होतो.पण हा सीजन कमालीचा वेगळा ठरला. बिग बॉस चारच्या घरातली आपली एन्ट्री झाली तेव्हा,तुझं असणं मला आधार वाटून गेलं. माझ्या कुटुंबातली एक सदस्य माझ्यासोबत आल्याचे समाधान मिळालं’.सध्या विशाल निकमची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
सध्या ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. खेळाचा अर्धा टप्पा पार झाल्यानंतर घरात आणखी चार नव्या स्पर्धकांनी एन्ट्री घेतली होती. यात बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात राखी सावंत, ‘बिग बॉस मराठी ३’चा विजेता विशाल निकम, माजी स्पर्धक मीरा जगन्नाथ आणि आरोह वेलणकर यांची एन्ट्री झाली. आधीच्या सीझनमध्ये एकमेकांच्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या स्पर्धकांमध्ये यावेळी नव्याने मैत्री होताना दिसली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









