Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र काल रात्रीपासूनच विक्रम गोखले यांना अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजलीही वाहिली. मात्र याबाबत मागील 24 तासांमध्ये गोखले यांची प्रकृती खालावली असली तरीही त्यांच्यावर उपचार करत डॉक्टरांची टीम प्रयत्नांनी पराकाष्ठा करत असल्याची माहिती डॉक्टर आणि गोखले कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यामुळे निधनाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला.
काय म्हणाले डॉक्टर आणि निकटवर्तीय
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. गेल्या 24 तासांपासून ते जगण्यासाठी झुंज देत आहेत. त्यांच्या शरीरातील विविध अवयव निकामी झाले असून, सध्या डॉक्टांची टीम त्यांच्या परीनं शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मागील 15 दिवसांपासून गोखले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती राजेश दामले यांनी दिली.जोपर्यंत डॉक्टर माहिती देत नाहीत तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत.कोणी जर अफवा पसरवत असेल तर त्यांना थांबवा असेही ते म्हणाले.
Previous Article‘इको सेन्सिटिव्ह’मधून सांगेतील गावे वगळा
Next Article ‘सीआरझेड’ प्राधिकरणावर मंडळाची स्थापना करावी









