Sunil Shende Passes Away : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी त्यांनी रात्री १ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर पारशीवाडा स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्य़ात आले.अभिनेत्याच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सुनील शेंडे यांच्या पश्चात पत्नी ज्योती,दोन मुले ऋषिकेश आणि ओंकार,त्याचप्रमाणे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
सुनील शेंडे यांनी मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टी सोबत त्यांनी नाट्य रंगमंचावरही अनेक भूमिका गाजवल्य़ा. वास्तव,गांधी,सरफरोश या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.निवडुंग (१९८९), मधुचंद्राची रात्र (१९८९), जसा बाप तशी पोर (१९९१), ईश्वर (१९८९), नरसिम्हा (१९९१) या सिनेमांमधून त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली.
Previous Articleअनेक आजारांवर उपयुक्त असणारा गुणकारी ओवा
Next Article ग्रीन स्कुलमुळे आनंददायी शिक्षण मिळेल









