मुंबई
युवा अभिनेता आणि लेखक सुबोध वाळणकर याच्या अकाली एक्झिटमुळे नाट्यक्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. सुबोधला अचानक ह्रदय विकाराचा तीव्र झटका आल्याने सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून अनेकांनी शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेता प्रसाद दाणी यानेही सुबोधच्या आठवणींना उजाळा दिला.
सुबोध वाळणकर ने आत्तापर्यंत राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका, व्यवसायिक नाटकांमधून काम केले आहे. २१७ पद्मिनी धाम या नाटकातील लक्षवेधी भूमिका, तसेच यंदाच्या सवाई विजेत्या चिनाब से रावी तक या एकांकिकेमधील अभिनयाने सुबोधने प्रेक्षकांच्य मनावर गारूड केले होतोच, मत्र त्याच्या सहकलाकरांमध्येही त्याच्याविषयी माया होती.









