याप्रकरणानंतर भडकला मराठी अभिनेता
पुणे
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना झाली आहे. शिवशाही बसमध्ये हा धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणावर अभिनेता पुष्कर जोग देखील भडकला आहे.
पुष्कर जोग या अभिनेत्याने या घटनेविषयी संतप्त पोस्ट शेअर केली आहे. पुण्यात एका २६ वर्षीय मुलीवर स्वारगेट बस स्टेशनच्या बसमध्ये अत्याचार झाले. क्लेशदायक, संतापजनक बातमी.. आता बास !! नराधमाला सोडू नका… सापडला तर धरून फोडा त्याला… #राग अशी पोस्ट पुष्कर जोगने केली आहे. यासोबत त्याने “आता रडायचं नाही नडायचं… बलात्कारांना रस्त्यावरच मारायचं ” अशा आशयाची पोस्टही त्याने शेअर केली आहे.
Previous Articleद्राक्ष व्यापाऱ्याकडून दीड कोटींचा गंडा
Next Article न्यायालयीन सुनावणी; अधिकाऱ्यांची दांडी








