वृत्तसंस्था/ मुंबई
अभिनेते नाना पाटेकर यांचे क्रिकेटप्रेमही अनेकदा त्यांनी जाहीररित्या व्यक्त केले आहे. नानांचे हे क्रिकेट प्रेम त्यांना वानखेडे स्टेडियमपर्यंत खेचून घेऊन आले. नानांनी शनिवारी मुंबई व पंजाब या सामन्याचा आनंद लुटला. त्यांच्यासोबत मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेही हे देखील होते. परचुरे यांनी काही खास फोटो चाहत्यांसोबत त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सामना संपल्यानंतर नाना पाटेकर आणि अतुल परचुरे यांनी सुनील गावसकर यांची भेट घेतली. या तिघांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी या भेटीचे फोटो पाहून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.









