अनासपुरे परुळेतील वेतोबाच्या दर्शनाला
परूळे /प्रतिनिधी
प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे कुटुंबीयांकडून परूळे येथील श्री देव वेतोबा चरणी चप्पल जोड मंगळवारी अर्पण करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील , वेंगुर्ले तालुक्यामध्ये, परूळे गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा मंदिर हे प्रसिद्ध आणि भक्तांच्या इच्छांची पूर्तता करणाऱ्या देवस्थानांपैकी एक आहे, असे मानण्यात येते.ही भावना अंगी बाळगून मकरंद अनासपुरे यांनी काल सपत्नीक श्रीदेव वेतोबाची पूजा केली व त्यानंतर चप्पल जोडा श्री चरणी अर्पण केला. मकरंद अनासपुरे हे मराठी चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठवाडी बोलीच्या ढंगातील संवादफेकीसाठी व विनोदी अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत.शिल्पा व मकरंद अनासपुरेंनी सिनेमात एकत्र कामं केली आहेत. शिल्पा आणि मकरंद यांनी ५ सिनेमे एकत्र केले आहेत. कापूसकोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला, नाग्या नाचविला, सुंबरान आणि गोष्ट छोटी डोंगराएवढी या सिनेमांत दोघंही होते. मकरंद आणि शिल्पा यांचा नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनमध्येहीसहयोग आहे. मकरंद व शिल्पा यांनी काल श्रीदेवी वोतोबाची विधीवत पूजा करून चप्पल जोडा अर्पण केला.









