बॉलिवूडमधला बिनधास्त अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ. त्याच्या ‘भिडू’ या शब्दाचे तर अनेक फॅन आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल जॅकीने हा शब्द आणला तरी कोठून?आपणचं नाही तर खुद्द बीग बी अमिताभ बच्चन हे देखील त्यांचे चाहते आहेत. तसेच जॅकी यांची भाषा त्यांना आवडते. जॅकी श्रॉफ यांचा जन्म लातूरचा असला तरी ते मुंबईत लहानाचे मोठे झाले आहेत. मुंबईच्या चाळींमध्ये त्यांचे बालपण गेले आहे. तिकडच्या आठवणी ते कायमच आपल्या मुलाखतीतीतून सांगत असतात. तसेच ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये त्याने ‘भिडू’ या शब्दाचे गुपित उलगडले होते. कसे चला जाणून घेऊया.
‘कौन बनेगा करोडपती’ या अमिताभ बच्चन यांच्या कार्यक्रमात एका भागात जॅकी श्रॉफ, सुनिल शेट्टी आले होते. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी जॅकी श्रॉफ यांना प्रश्न विचारला की ‘तुम्ही ही भाषा बोलता, भिडू हा शब्द आला कुठून’? यावर जॅकी यांनी नेहमीप्रमाणे आपल्या त्याच भाषेत उत्तर दिले, ‘याच शहरातून हा शब्द आला, जिथे मी वाढलो तिथली भाषा बोलतो. तसेच असं बोलण्यमागे तुमचा हातदेखील आहे. यावर अमिताभ बच्चन यांना आश्चर्य वाटले ते म्हणाले ‘मी कस काय’? त्यावर लगेच जॅकी म्हणाले, ‘तुमचे चित्रपट बघत आम्ही मोठे झालो आहोत आम्ही तुमचे चाहते होतो, तुमचा ‘अमर अकबर अँथनी चित्रपटातले’ संवाद ऐकूनच आम्ही असे बोलायला लागलो’. पुढे अमिताभ बच्चन यांनी चित्रपटातील काही संवाद म्हणून दाखवले.
Previous Article‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणांच्या व्हिडिओचा होणार फॉरेन्सिक तपास
Next Article गोव्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 20 बांगलादेशींना अटक









