विध्वंसक स्फोटाची शक्यता
बोलीवियाच्या सुर लिपेज प्रांतातील उतुरुंकु ज्वालामुखी मागील अडीच लाख वर्षांपासून निष्क्रीय असून तो आता सक्रीय झाला आहे. वैज्ञानिकांनी ज्वालामुखीच्या खाली खोल मॅग्मा चेंबर्समध्ये होत असलेल्या हालचालींचा शोध लावला असून तेथे लाव्हारस आणि गॅस हळूहळू पृष्ठभागाच्या दिशेने सरकत आहे.
उतुरुंकु : झॉम्बी ज्वालामुखी
उतुरुंकुला ‘झॉम्बी’ ज्वालामुखी म्हटले जाते, कारण हा तांत्रिक स्वरुपात निष्क्रीय आहे, परंतु तरुही यात जीवनाचे संकेत दिसून येतात. याचा अखेरचा विस्फोट अडीच लाख वर्षांपूर्वी झाला होता, परंतु अलिकडच्या दशकांमध्ये हा भूकंपीय हालचाली आणि गॅस उत्सर्जनासाब्sात सक्रीयता दाखवत आहे, या हालचाली सामान्य स्वरुपात कुठल्याही ज्वालामुखीशी संबंधित चिंताजनक असतात.
या हालचालींनी उतुरुंगुच्या आसपासच्या परिदृश्याला एका ‘सोम्ब्रेरो’ (टोपीसारख्या) आकृतीत बदलले आहे. ज्यात ज्वालामुखीचे शिखर केंद्रात उंच आहे. आसपासची भूमी सखल झाली आहे, अशाप्रकारच्या हालचालींमुळे स्थानिक लोकसंख्येत चिंता निर्माण झाली आहे, कारण एक मोठ्या ज्वालामुखीचा विस्फोट विध्वंसक ठरू शकतो. एका आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पथकात चीन, ब्रिटन आणि अमेरिकेचे तज्ञ सामील होते, या पथकाने उतुरुंकुच्या खालील हालचाली समजून घेण्यासाठी अनेक तंत्रज्ञानांचा वापर केला.
स्थानिक समुदायासाठी धोका नाही
उतुरुंकुच्या आसपास राहणाऱ्या लोकसंख्येसाठी या अध्ययनातून ज्वालामुखीपासून तत्काळ धोका नसल्याचे समजते. परंतु बोलीवियाच्या अन्य निष्क्रीय ज्वालामुखींवर नजर ठेवली जाते, कारण त्यातील काही सक्रीय होऊ शकतात अशी सूचना वैज्ञानिकांनी केली आहे. लोक ज्वालामुखींना पाहता आणि हा विस्फोट करणार नाही असे मानतात, परंतु प्रत्यक्षात पृष्ठभागावर निष्क्रीय दिसणारे ज्वालामुखी खोलवर मृत नसतात असे उद्गार कॉर्नेल विद्यापीठाचे भूभौतिकीतज्ञ मॅथ्यू प्रिचर्ड यांनी काढले आहेत. नव्या तंत्रज्ञानांचा वापर जगभरातील 1400 हून अधिक संभाव्य ज्वालामुखींवर नजर ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. जेणेकरून त्यांच्या धोक्याचे आकलन करत वेळीच पावले उचलता येतील अशी सूचना वैज्ञानिकांनी केली आहे.









