बेडकिहाळमध्ये काँग्रेस प्रचाराला गती: मताधिक्य देण्याचा निर्धार
बेडकिहाळ: निपाणी मतदारसंघाच्या शाश्वत विकासाला माजी आमदार काका पाटील यांनी प्रथम प्राधान्य दिले आहे. शाश्वत कामांमुळे मतदारसंघात आज देखील काकांकडे मतदार आपुलकीने पाहतात. यामध्ये अत्यंत महत्त्वाचा शाश्वत विकास म्हणजे काळम्मावाडी करार करून पाणी या भागात हरितक्रांती केले. परंतु विरोधक किती दिवस तेच सांगणार असा प्रश्न विचारतात. त्यावर उत्तर एकच आहे याच पाण्यावर हा भाग सधन झाला व सर्वसामान्य शेतकर्याच्या हातात पैसा आला. त्यामुळे तुमचे कारखाने आणि तुमच्या बँका उभारल्या गेल्या आणि आज याच पैशाच्या माध्यमातून जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. जो पय\त नद्यांमध्ये पाणी राहिल तो पर्यंत काकांना आणि काँग्रेस पक्षाला विसरणे मतदारांना शक्य नाहि. असा शाÍवत विकास साधणार्या काका पाटील यांच्या विजयासाठी बेडहिकाळकर आणि मतदारसंघातील कार्यकर्ते एकवटले असल्याचे कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेस पक्षाचे सहसचिव प्रमोदकुमार पाटील यांनी सांगितले.
बेडकिहाळ येथे काँग्रेसची प्रचार सभा पार पडली यावेळी ते बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी कार्डच्या माध्यमातून 200 युनिट प्रति माfहना वीज मोफत, प्रत्येक कुटुंबातील प्रमुख माfहलेस 2000 रुपये प्रतिमहा महागाई भत्ता, प्रति व्यक्तीस 10 किलो मोफत तांदुळ, 3000 रुपये पदवीधर बेरोजगारांना, डिप्लोमा शिक्षण घेतलेल्या युवकांना 1500 रुपये प्रति महिना, महिलांना राज्यात मोफत बसप्रवास देण्यात येणार आहे. या गॅरंटी कार्डचे वितरण युवा नेते दत्तकुमार पाटील, सुप्रिया पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बेडकिहाळ येथे वाटप करण्यात आले. यावेळी काका पाटील यांचा भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, माजी ग्रा. पं. अध्यक्ष शंकर पाटील, माजी जि. पं. सदस्य अशोक आरगे, चाBद मुल्ला, ग्रा. पं. अध्यक्षा सविता पाटील, उपाध्यक्षा महादेवी यादव, नानासाहेब पाटील, जीवन यादव, डॉ. विक्रम शिंगाडे, धनंजय मोहिते, आण्णासाहेब नलावडे, ताजुद्दिन मुल्ला यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.









