कुडाळ –
कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेना उबाठा गट भाजपला धक्क्यावर धक्के देत आहे. कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली – गौतमवाडी येथील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपला सोडचिठ्ठी देत आमदार
वैभव नाईक व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला.आमदार नाईक यांनी प्रवेशकर्त्याना शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे स्वागत केले.
वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे प्रवेशकर्त्यानी यापुढील काळातही ते वारंगाची – तुळसुली गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास व्यक्त केला.
धाकू जाधव,निलेश जाधव, सत्यवान जाधव,संतोष जाधव,रामा जाधव,संतोष जाधव,महेश जाधव, मयूर चव्हाण,अनिल चव्हाण,भिसाजी जाधव,दत्तू कदम,छाया जाधव पूजा कदम,प्रियंका जाधव,अशोक जाधव, रामा जाधव संतोष जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला धाकू जाधव म्हणाले, नारायण राणे स्वतः खासदार असून देखील त्यांनी आपल्या दोन्ही चिरंजीवांना विधानसभेत उमेदवारी दिली. राणे हे घराणेशाही करीत असून सर्वसामान्य नेतृत्वाला पुढे येऊ देत नसल्याने आपण आमदार नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करीत असल्याचे सांगितले. वैभव नाईक म्हणाले की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास कार्यकर्त्यांनी दाखविला. त्याबद्दल विशेष ऋण व्यक्त करून वारंगाची तुळसुली गावचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी प्रवेशकर्त्यांना दिली .
याप्रसंगी शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख संजय पडते,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, घावनळे विभाग प्रमुख पप्पू महाडेश्वर, तुळसुली शाखाप्रमुख उदय तुळसुलकर, मांडकुली सरपंच तुषार सामंत,बाबा वारंग,आनंद वारंग,प्रमोद मेस्त्री, केरवडे उपशाखाप्रमुख संतोष परब, राकेश तुळसुलकर, विजय उमळकर, संचित ठाकूर,सागर जाधव,सिद्धेश धुरी,अभी मराठे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









