सावंतवाडी : प्रतिनिधी
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने येथील त्यांच्या कार्यालयात केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थितांकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान यावेळी मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीपक भाई मित्र मंडळाकडून सामाजिक संघटनेला आपत्कालीन व्यवस्थापनासाठी आर्थिक मदतीचा हात देखील देण्यात आला आहे.









