न्यायालयात हजर केले असता केली दंडात्मक कारवाई
शाहुवाडी प्रतिनिधी
बर्की तालुका शाहूवाडी येथील धबधबा पाहण्यास जाणाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने बंदी घालण्यात आली होती .या बंदी आदेशाचे उल्लंघन करून पर्यटन स्थळी हुलडबाजी केले प्रकरणी शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने आठ पर्यटकांच्यावर दंडात्मक कारवाई केली .
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार शाहुवाडी यांनी तालुक्यातील बर्की धबधबा या पर्यटनस्थळी सीआरपीसी कलम 144 अन्वये बंदी आदेश लागू केला आहे.असा बंदी आदेश असताना देखील आदेशाचे उल्लंघन करून 30 जुलै रोजी बर्की पर्यटनस्थळी हुल्लडबाजी करणारे 1) संदीप श्रीमंत इंगळे 2)आनंदा फातले 3) आकाश कुरणे 4)प्रतिक साळोखे 5) नितीन मानकर 6) अभिजीत कुरणे 7) फराज सय्यद 8) प्रथमेश साळोखे सर्व रा बत्तीस शिराळा (सांगली ) ह्या पर्यटकांचेवर शाहुवाडी पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा दाखल केलेल्या सर्व पर्यटकांना कळे येते न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर पर्यटकांना प्रत्येकी 500/ रु दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या वतीने पर्यटकांना आवाहन करण्यात येते. की शाहुवाडी तालुक्यातील बर्की, पावनखिंड, मानोली, केर्ले, कांडवण,उखळू, पालेश्वर या पर्यटन स्थळी सीआरपीसी कलम 144 अन्वये बंदी आदेश लागू केले आहेत . सदर आदेश लागू आहेत तो पर्यंत कोणीही पर्यटकांनी सदर ठिकाणी येवू नये. जर बंदी आदेशाचं उल्लंघन केलं तर संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे .









