मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून परवाने रद्द करण्याचे निर्देश
पणजी : राज्यात बेकायदा रेंट-ए-बाइक आणि रेंट-ए-कार चालविणाऱ्या व्यावसायिकांना राज्य सरकारने दणका दिला असून, व्यावसायिक कारणांसाठी खाजगी वाहने वापरताना आढळणाऱ्या रेंट-ए-कार आणि रेंट-ए-बाईक चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी अध्यादेश काढण्याचे निर्देश राज्य परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. सीमा तपासणी नाक्यांच्या पायाभूत सुविधा आणि अंमलबजावणी तयारीच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी पणजी येथील पोलिस मुख्या यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे निर्देश जारी केले आहेत.
उत्तर गोव्यातील पत्रादेवी आणि केरी आणि दक्षिण गोव्यातील मोले आणि पाळोळे येथील पायाभूत सुविधांच्या तयारीचा समावेश होता. रस्त्याच्या कडेला सार्वजनिक सुविधा विकसित करण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणी आयओसीएल पेट्रोल पंप उभारण्यासाठी जमिनीच्या उपलब्धतेवरही बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा (आयटीजी) द्वारे वाहतूक संबंधित अनुप्रयोग विकासाच्या प्रगतीचा आणि एसपी ट्रॅफिकच्या नेतृत्वाखालील रोलआउट योजनांचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सूचना, स्वयंचलित सीमा देखरेख आणि वाहन डेटाबेससह अंमलबजावणी प्रणालींचे एकत्रीकरण यासाठीच्या धोरणांवर चर्चा केली.









