तिरुअनंतपुरम :
ईडीने मंगळवारी सीएसआर फंड घोटाळ्याप्रकरणी केरळमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या घोटाळ्यात लॅपटॉप, दुचाकी आणि घरगुती उपकरणे निम्म्या किमतीवर देण्याचे खोटे आश्वासन देत केरळमध्ये अनेक लोकांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी मुख्य संशयित आनंदू कृष्णन यांच्याकडून पैसे प्राप्त करणाऱ्या संस्था, ट्रस्ट आणि व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. लोकांकडून जमविण्यात आलेल्या रकमेचा आकडा जाणून घेण्याचा प्रयत्न तपासाद्वारे केला जात आहे. या तपासाच्या कक्षेत काही राजकीय नेते, इलेक्टॉनिक डीलर्स, ऑटोमोटिव्ह डीलर्स, सहकारी बँका आणि खतनिर्मिती कंपनी सामील आहे.









