चलन गैरव्यवहार प्रकरणात कोल्हापूर पोलीस नाईकावर कारवाई
कोल्हापूर : एक कोटी रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करुन त्याची विक्री करणाऱ्या कोल्हापूर पोलीस दलातील मोटर वाहन विभागातील पोलीस नाईक इब्रार सय्यद आदम इनामदार (वय ४४, रा. आंबे गल्ली, कसबा बावडा) याला शनिवारी पोलीस दलातून बडतर्फ केले.
बनावट नोटांची छपाई करुन देशविघातक कृत्य केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला आहे. शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी, पाचशे, दोनशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीचा मिरज महात्मा गांधी चौक पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या टोळीकडून ९९ लाख २९ हजारांच्या बनावट नोटा, इतर साहित्य असा सुमारे १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
या प्रकरणी पोलीस नाईक इब्रार इनामदार याच्यासह सुप्रित काडाप्पा देसाई (वय २२, रा. इदरगुच्ची, गडहिंग्लज), राहुल राजाराम जाधव (वय ३३, रा. कोरोची, ता. हातकणंगले), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, रा.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची कारवाई टाकाळा, राजारामपुरी), सिद्धेश जगदीश म्हात्रे (वय ३८, रा. मालाड पूर्व मुंबई) यांना शुक्रवारी मिरज पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाची पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी गंभीर दखल घेतली. इब्रार इनामदार याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणे, पोलीस दलातील पदास अशोभनीय बर्तन केले. तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलमांचा भंग करुन बनावट भारतीय चलन तयार करणे, विक्री करणे, वापरणे असा गंभीर गुन्हा केला आहे.
ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम व्यावसाईक संजय मोहिते यांना दमदाटी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. संजय मोहिते व आसिया काझी यांचा भागिदारीमध्ये बांधकाम व्यवसाय होता. आर. के.. नगर येथील एका बांधकाम साईटवरील काही युनिटची विक्री काझीने इब्रार इनामदार याला केली होती.
याप्रकरणी इनामदार याने मोहिते यांना वारंवार फोन करुन धमकी दिली होती. संजय मोहिते यांनी याबाबतचा तक्रार अर्ज जानेवारी २०२५ मध्ये दिला होता. मात्र इनामदारने आपले वजन वापरुन हा अर्ज चार महिने प्रलंबित ठेवला होता. अखेर मे २०२५ मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.








