सिंगल प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानांवर छापे
पणजी : राज्यात सिंगल प्लास्टिक वापरावर बंदी असतानाही ते सर्रासपणे वापरले जात असल्याने यावर निर्बंध यावेत यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी छापे घालत आहेत. त्यामुळे बंदी असतानाही सिंगल प्लास्टिक वापरणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडून 200 ऊपये ते 5000 हजार ऊपये यापर्यंत दंड आकारून साहित्यही जप्त केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सिंगल प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी अचानक छापे घालून दंड आकारण्याबरोबरच साहित्यही जप्त केले आहे. 7 फेब्रुवारी 2023 यापासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये 15 मे 2023 पर्यंत सुमारे 35 विविध व्यावसायिकांना दंड ठोठावला असून, त्यांचे सामानही जप्त केले असल्याचे प्रदूषण नियंत्रम मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये 120 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या असलेल्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कप व इतर साहित्यांचा समावेश आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये गावडे जनरल स्टोअर (धारबांदोडा), श्री दत्त गुरू ट्रेडर्स (धारबांदोडा), पुरोहित निरंजन स्वीट (फोंडा), महालक्ष्मी इलेक्ट्रीक अॅण्ड हार्डवेअर (फोंडा), कीर्ती बार अॅण्ड रेस्टॉरंट (फोंडा), रिंका मार्केटिंग (फोंडा), सुपर इंडिया इंडस्ट्रीज (कुंडई औद्योगिक वसाहत, फोंडा), द ज्यूस सेंटर (कांदोळी, बार्देस), अॅव्ह मारिया ज्यूस सेंटर (कांदोळी), गोविंद स्टोअर (कांदोळी), शुगर केन ज्यूस बार (कांदोळी), कुमार कोकोनेट सेंटर (कांदोळी), फ्रूट ज्यूस सेंटर (कांदोळी), मारिया क्लॉथस शॉप (कांदोळी), डॉल्फिनोस (कांदोळी), विजया शॉपिंग सेंटर (कांदोळी), स्टॉप अॅण्ड शॉप सुपर मार्केट (कांदोळी), सुनील बोरकर ा वाईन शॉप (कांदोळी), विक्रांत डी. पांदोळकर (कांदोळी), द जैसवाल वाईन शॉप (कांदोळी), राईका सुपर मार्केट (अंजुना), सतेज सीरसाट ा जनरल स्टोअर (अंजुना), क्रिष्णा जनरल स्टोअर (अंजुना), श्री गणेश जनरल स्टोअर (अंजुना), ए. आर. बेकरी (पणजी-तिसवाडी), सनशाईन जनरल स्टोअर (कळंगुट ा बार्देश), दुर्गा मार्केटींग (कळंगुट), प्रभात सुपर मार्केट (पर्वरी), मनीष सुपर मार्केट (पर्वरी), श्रीराम मोबाईल अॅण्ड गीफ्ट शॉप (पर्वरी), मनीष कॉस्मेटीक मार्केट (पर्वरी), लक्ष्मी ट्रेडर्स (पर्वरी), काजू पॅलेस (पर्वरी), सिद्ध जनरल स्टोअर (पर्वरी), मापले लीफ जनरल स्टोअर (पर्वरी) या व्यावसायिकांना सुमारे 200 ऊपये ते 5000 हजार ऊपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला असून, त्यांचे साहित्यही जप्त केले आहे.
तीन महिन्यांत 61 हजारांहून अधिक दंड वसूल
राज्यात सिंगल प्लास्टिक वापरावर बंदी असतानाही ज्या व्यावसायिकांनी नियम धाब्यावर बसवून वापरले त्यांच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने फेब्रुवारी, मार्च व मे या तीन महिन्यात कारवाई करताना सुमारे 61 हजारांहून अधिक दंड वसूल केला आहे. राज्यातील इतर भागातीलही ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.









