रत्नागिरी :
सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने मत्स्यमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ड्रोन प्रणालीने क्रांती घडवण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसात रत्नागिरीच्या सागरीक्षेत्रात अवैध मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर ड्रोन प्रणालीद्वारे कारवाई केली आहे. यामध्ये दोन ट्रॉलर्स व एका पर्ससीन नौकेचा समावेश आहे.
राज्याच्या समुद्रकिनारी ९ जानेवारीपासून ९ ठिकाणी ड्रोन प्रणाली उड्डाण आणि मुंबईतील नियंत्रण कक्षाचे उदघाटन नुकतेच मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात साखरीनाटे आणि भाट्ये या दोन ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.








